“5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .”

संपादक रुपेश डोलारे धाराशिव

मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 विनोद जानराव पोह/1003 वाघमारे,पोना/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे, पोअं/प्रकाश बोईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 272/2024 कलम 394 मधील व इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव हा वडजी कडे जाणारे रोडचे बाजूस फटाक्याचे कारखान्याजवळ थांबलेला आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास मोटरसायकल सह ताब्यात घेवून त्याचे कडे असलेल्या मोटरसायकली बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने धाराशिव येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व कुक्या उर्फ मोतीराम बादल शिंदे याचे सोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणल्या असुन मोहा येथे पत्र्याचे शेडचे पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत असे सागिंतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल सह दोन डिझेल कॅन्ड ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे 1) आनंदनगर100/2025 भा.दं.वि.सं. कलम 303(2), 2)276/2020 कलम 379 भा.दं.वि.सं, नळदुर्ग 3) गुरनं 57/2025 कलम 3303(2) भा.न्या.सं.,4) गुरनं 83/2025 भा.न्या.सं. कलम 303(2), 5)पोस्टे धाराशिव शहर गुरनं73/2023 कलम 379, पोस्टे येरमाळा गुरनं 40/2025 303(2), पोस्टे गातेगाव जि. लातुर गुरनं23/2025 कलम 303 (2) या प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष आरोपी नामे- सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील मोटरसायकल एकुण 1,61,510 ₹ किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.

           सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक महेबुब अरब, पोअं/विनायक दहीहंडे,पोअं/प्रकाश बोईनवाड (TAW) सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे..