काटी येथील निराधार लाभ धारकांचे बंद झालेले अनुदान त्वरीत चालु करावे, अन्यथा २९ एप्रिल रोजी आंदोलन करणार, माजी सरपंच अशोक जाधव यांचा इशारा.

 

मौजे काटी येथील खालील सह्या / अंगठे करणारे सं.गा., श्रा. बा. योजनेतील लाभार्थी असुन त्यांचे अनुदान गेल्या ४ ते ५ महिन्यापासुन बंद झालेले आहे. शासनाच्या सुचने नुसार ई-केवायसी, आधार सिडिंग, बँक खात्यास आधार लिंक हे सर्व प्रोसिजर यापूर्वीच केलेली आहे व तसे या कार्यालयास कळविले आहे. तरी सुध्दा त्यांचे अनुदान अद्याप चालु झालेले नाही. त्यामुळे निराधार लोकांची उपसमार व अत्यंत हाल होत आहेत.




तरी खालील लाभधारकांचे अनुदान त्वरीत पुर्ववत चालु करावे अन्यथा दिनांक २९/०४/२०२५ मंगळवार रोजी मौजे काटी येथील तलाठी कार्यालयासमोर धरणे अंदोलन करण्यात येईल असा इशारा काटीचे माजी सरपंच, अशोक जाधव यांनी इशारा दिला आहे, या निवेदनावर अशोक जाधव सह लाभधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.