महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना,(संलग्न : भारतीय कामगार सेना) प्रमुख मार्गदर्शक मा. आमदार सचिन अहिर सरचिटणीस, भारतीय कामगार सेना, व राज्य आध्यक्ष विलासभाऊ कुमरवार,तसेच राज्य सरचिटणीस दयानंद आप्पा एरंडे,यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे धाराशिव येथे राज्यस्तरीय कामबंद आंदोलन.

 


महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना,(संलग्न : भारतीय कामगार सेना) 


प्रमुख मार्गदर्शक मा. आमदार सचिन अहिर सरचिटणीस, भारतीय कामगार सेना, व राज्य आध्यक्ष विलासभाऊ कुमरवार,तसेच राज्य सरचिटणीस दयानंद आप्पा एरंडे,यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे धाराशिव येथे राज्यस्तरीय कामबंद आंदोलन, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना 58 25 चे धाराशिव जिल्हा सचिव बबन दादा थोरात, व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना 58 25 जिल्हाध्यक्ष श्री उद्धवजी घाडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली,धाराशिव पंचायत समिती कार्यालय येथे दिनांक १ मे २०२५ ते २ मे २०२५ आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या : १) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे. २) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करणे. ३) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागु करणे ४) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन (इ. पी. एफ.) या कार्यालयात करणे. ५) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतन लागु करणे व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे. ६) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे. ७) जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यामधून एकुण रिक्त पदाच्या १०% प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे.