तुळजापूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी. विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन




तुळजापूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी. विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन. तुळजापूर दिनांक 30. बाराव्या शतकातील क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त येथील श्री वीरशैव जंगम मठात व नळदुर्ग रोड येथील महात्मा बसवेश्वर चौकात कार्यक्रम संपन्न झाला.

 वीरशैव जंगम मठात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी. जिपचे माजी अध्यक्ष धीरज पाटील. ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे. माजी उपनगराध्यक्ष अमर मगर. पाळीकर पुजारी मंडळाचे विपिन शिंदे. भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले. शिवसेनेचे श्याम पवार.माजी नगरसेवक औदुंबर कदम. रामचंद्र रोचकरी . राजेश शिंदे. लालासाहेब मगर. नबीचाचा शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँड गिरीश शेटे. गुरुनाथ बडूरे. प्रफुल मस्के.महाबळेश्वर तोडकरी. विश्वनाथ शेटे. अँड अंजली साबळे. अस्मिता शेटे. ज्योती बचाटे.वैशाली धरणे. अमृता बचाटे. विजया शेटे. राजश्री धरणे.रेखाताई कोरे.सारीका बडूरे.हिराबाई उळेकर. वैशाली बडूरे.अभिषेक कोरे. कैलास मस्के. मनोज गवळी .सचिन नाडापुडे. सोमनाथ शेटे. महादेव तोडकरी. लक्ष्मण उळेकर. अँड मंगेश नाडापुडे. विवेक कोरे. राजू धरणे. राहुल साखरे. महेश नडमने. भारत कोप्पा.नागेश लकशेट्टी. लक्ष्मण साखरे. अशोक शेटे. विशाल शेटे. नागनाथ गिराम .विश्वनाथ स्वामी. अक्षय आडसकर. रवी शेरेकर आदी उपस्थित होते. प्रस्ताविक वर बोलताना बडूरे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे जीवन कार्याविषयी माहिती दिली . यावेळी जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण साखरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप. व पाणपोई सुरू करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर जळकोटे यांनी केले.