येवती येथील कालिदास बाळासाहेब गायकवाड यांना पीएच.डी. पदवी प्रदान

तुळजापूर - येवती येथील श्री. बाळासाहेब शामराव गायकवाड यांचे चिरंजीव, श्री. कालिदास बाळासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली. 'Fabrication, Chracterization and Gamma Ray Interaction Studies of Ferrite Nanoparticles' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. प्रविणा संजय उगिले (पवार) मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. कालिदास यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. विभागप्रमुख डॉ. पी. एस. उगिले (पवार), डीन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रा. एम. डी. शिरसाट, प्रा. बी. एन. डोळे व प्रा. पी. बी. उंदरे यांनी अभिनंदन केले आहे.