तुळजापूर बस स्थानकावर पाणी ना लाईट मग उद्घाटनाची कसली घाई

तुळजापूर -(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूर शहरात जुने बस स्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानक उभा केली आहे. बसतो ना कधी काम पूर्ण झाले नसून अनेक कामे अर्धवट आहेत.अद्याप नवीन बस स्थानकावर पाणी ना लाईट मग उद्घाटनाची एवढी कसली झाली घाई 

बस स्थानकाचे बांधकाम १० जून २०२३ ला सुरू झाले काम पूर्ण करण्याची मुदत १८ महिने होती, पण २२ महिने झालं तरी पण काम पूर्ण झालं नाही.उद्या १ मे महाराष्ट्र दिन या निमित्त धाराशिव येते ध्वजारोहण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री मा.श्री.प्रतापराव सरनाईक हे येत असून त्यांच्या या दौऱ्यातील निमित्त साधून बांधकाम न पूर्ण होता, तुळजापूरचे बस स्थानकाचे उद्घाटन आज दिनांक 30 बुधवार रोजी दुपारी चार वाजता होत आहे. पण या बस स्थानकावर पाणी ना लाईट मग उद्घाटनाची कसली घाई अशी चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे.