मुस्लिम सेवा संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष तांबोळी मकबुल यांनी, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निवेदनाव्दारे तीव्र शब्दांत निषेध
मुस्लिम सेवा संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष मा.तांबोळी मकबुल यांनी धाराशिवचे जिल्हा अधिकारी यांच्या तर्फे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निवेदनाव्दारे तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे प्राण गेले असून, देशातील शांतता व सौहार्द धोक्यात येण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
या निवेदनात अध्यक्षांनी म्हटले आहे की, जम्मू-कश्मीर येथील पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात ' अतिरेक्यांनी निष्पाप 26 लोकांचे बळी घेतले आहेत तसेच अनेक लोकांना जखमी केले आहेत, दहशदवादाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. पाहलगाममधील हल्ला मानवतेवरच झालेला हल्ला आहे. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध तुळजापूर शहरातील मुस्लीम समाज एकत्र येवून करतो आणि शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
पहलगाममधील पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला हा पूर्व पदावर आलेल्या शांत कश्मीरीयतवर झालेला हल्ला आहे तिथल्या जीवन, रोजगार आणि देशाशी एकरुप असलेल्या लोकांच्या भुमीकेवर हा हल्ला आहे. सदर निंदनीय घटनेस ज्या व्यक्ती, संस्था संघटना व देश जबाबदार आहेत ते शोधुन त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही होवून निषेध व्यक्त झाला पाहिजे. सरकारने या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकाला जबर किंमत मोजायला लावली पाहिजे या कृतीसाठी देशातील संपूर्ण जनता सरकाराच्या पाठीशी खंबीरपणे राहील सरकारने योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करुन या हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप लोकांचा बळी गेलेले आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना योग्य प्रकारे न्याय द्यावा ही विनंती.
या निवेदनावर मुस्लिम सेवा संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष मा. तांबोळी मकबुल यांची स्वाक्षरी आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.