दारु पिऊन का आलास? या कारणावरुन, दहीवडीत बापाने केला मुलाचा खुन.

 


तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बिभीषण शेषद्री चव्हाण, वय 50 वर्षे, रा. दहिवडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.05.2025 रोजी 09.30 वा. सु. दहीवडी येथे मयत नामे- समाधान बिभीषण चव्हाण, वय 25 वर्षे, रा. दहिवडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिऊन का आलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठीने मारहाण करुन गंभीर करुन जिवे ठार मारले,अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विश्वास शेषाद्री चव्हाण, वय 50 वर्षे, रा. दहीवडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 103 (1), 109 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.