“गाडीचा ड्रायव्हरच निघाला चोर पोलीस स्टेशन भूम व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी केले गजाआड.”


दिनांक 29.05.25 रोजी भुम शहरातील हॉटेल शिवनेरी समोरून फिर्यादी नामे- अनिल पांडुरंग बेदरे रा. जामखेड यांच्या गाडीतून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम अशी एकूण 09,62,110/रुपये चा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदर बाबत पोलीस ठाणे भूम येथे गुरनं 111/25 क 306 भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बाबत फिर्यादी यांनी त्यांचा ड्रायव्हर. रवींद्र परदेशी रा. जामखेड यांचेवर संशय असल्याचे सांगितले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावरून पोस्टे भुम पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तांत्रिक माहिती गोळा करून ताब्यातील आरोपीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य एक साथीदाराचे नाव चौकशी दरम्यान सांगितले प्राप्त माहितीवरून आरोपी नामे चंद्रकांत चव्हाण रा. सावरगाव ता. जामखेड यास सावरगांव येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून नमूद दोन आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण 65 ग्रॅम सोने, 75 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम 1,50,000 रुपये असा एकूण 08,12,000 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सरोदे पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर, पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना अप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी पोस्टे भूम पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार स्था गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक संजय जराड, प्रल्हाद सरोदे पोस्टे भुम पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पो ना संदेश क्षिरसागर, चापोहे अरविंद डोके, पोशी चालक रत्नदीप डोंगरे यांनी संयुक्तपणे केली आहे.