श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याला वाढत चाललेला धोका व गाभाऱ्याचे होत आसलेले विद्रुपीकरण बाबत, इंद्रजीत साळुंखे यांचे निवेदन



 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याला मूळ रूप प्राप्त करण्यासाठी भिंतीवरील स्टाईल व गार्बल काढण्यात आले तेव्हा मंदिराचे शिखराचा भार पेलवणाऱ्या शाळांना तडे गेल्याचे आढळून आले. तसेच मुळ गाभारा तसेच चोपदार गाभारा व सिंह गाभाऱ्यातील छत व भिंती सुध्दा कमकुवत झालेले आढळून आले आहे. आणि सध्या भुगर्भातून गुढ आणि प्रचंड आवाजा सह जमिन हादरत आहे.


आणि हे सर्व देवी मुर्तीच्या व भावीकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने फार धोकादायक आहे. गाभाऱ्याच्या छताला धोका होत असल्याने प्रशासन वारंवार छताला व दगडी पिलरना टेकन लावून वेळ मारुन नेत आहे. जागोजागी टेकन लावल्याने गाभाऱ्याचे विद्रुपिकरन होत आहे. देवि मुर्ती व भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन तात्काळ देवी मुर्ती मंदिरात इतरत्र स्थापना करुन भवानीशंकर सभागृह ते देवीजींचा गाभारा हे सर्व काढून त्या ठिकाणी भाविकांची वाढती संख्या व भाविकांचे सुलभ व समाधान कारक दर्शन पाहता सध्याचा देवीचा गाभारा, चोपदार गाभारा तसेच सिंह गाभारा प्रशस्त आसने अत्यंत गरजेचे आहे.


पुढील पाचशे वर्षांच्या वाढत्या भाविक संख्येचा विचार लक्षात घेऊन प्रशस्त गाभारा निर्माण करावा असे इंद्रजीत साळुंखे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर इंद्रजीत साळुंखे यांची स्वाक्षरी आहे