तुळजापूर दिनांक 27 तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे गुरुवारी केदारपिठाचे दिवंगत जगदगुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या येथील समाधीस अभिषेक. रुद्रपूजा . महाप्रसाद सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर केदार पिठाचे विद्यमान जगद्गुरु जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभा घेण्यात आली. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांनचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर. आमदार प्रवीण स्वामी. ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील ट्रस्टचे रामचंद्र आलूरे .गुरुनाथ बडूरे लक्ष्मण उळेकर .गोविंदराव माकणे . डॉ. अजिंक्य पाटील. भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले. सेनेचे अमरराजे कदम .राष्ट्रवादीचे महेश चोपदार. भाजपाचे गुलचंद व्यवहारे. बाबा घोगते. अभिषेक कोरे. सोमनाथ शेटे.गोविंद खुरूद. सचिन ठेले सह विविध क्षेत्रातील मान्यवर व विविध मठाचे शिवाचार्य उपस्थित होते. यावेळी केदारपिठाचे जगदगुरु यांनी सांगितले की केदारनाथ येथील पिठावर जगदगुरु म्हणून त्यांच्या पट्टाभिषेक कार्यक्रमास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेड येथे एक ते आठ डिसेंबर दरम्यान भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी देशातील नामवंत प्रवचनकार. कीर्तनकार यांना निमंत्रित केले असून यावेळी विश्वशांतीसाठी महायज्ञ होणार असून महायज्ञासाठी विविध राज्यातील धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे ते म्हणाले. या कार्यक्रमास परिसरातील हजारो पुरुष महिला भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ बडूरे यांनी केले.
दीप प्रज्वलन करताना केदारपिठाचे जगदगुरु. आमदार प्रवीण स्वामी. आप्पासाहेब पाटील .गुरुनाथ बडूरे. लक्ष्मण उळेकर. गोविंदराव माकणे आदी .
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.