जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी (मा ) येथे आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढण्यात आली


 दिनांक 05 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी (मा ) येथे आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात सकाळी ठीक 9:00 वाजता झाली. दिंडीमध्ये सामील होण्यासाठी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोषाखात तयार होऊन आले होते. तसेच विठ्‌ठल रखुमाईने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले . दिंडीसाठी पालखी सज्ज करण्यात आली होती. लहान मुले टाळ , पखवाज , भगव्या पताका घेऊन पालखीत सहभागी झाली होती. दिंडीमध्ये सर्व पालकांनी व गावकऱ्यांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अंगणवाडीची मुले व मॅडमनीही दिंडीत सहभाग घेतला.

शाळेतून निघून दिंडी गावातील चौकात थांबवण्यात आली. त्याठिकाणी एक मोठे रिंगण करून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच गावकऱ्यांनी ही टाळाच्या ठेक्यावर फुगडीचा ताल धरला . अशा प्रकारे सर्व मुलांनी व गावकऱ्यांनी विठू नामाचा गजर करून दिंडीचा आनंद घेतला.त्यानंतर गावात ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाईची पूजा करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी मुलांना खाऊचे वाटप केले. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात वारकरी दिंडी पार पडली.या दिंडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. थोडसरे सर तसेच सहशिक्षिका श्रीमती भुतेकर मॅडम त्याचबरोबर अंगणवाडी ताई सौ.स्नेहा कदम या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.