दि. 2 फेब्रुवारी2025 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानसोहळा तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंथनच्या तुळजापूर संचालिका सौं मोहिनी क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी अध्यापक विद्यालय तुळजापूरचे प्राचार्य श्री शशिकांत दोंड सर,प्राध्यापक श्री विवेक कोरे, सहा. प्रशासन अधिकारी ऋषिकेश पिंपळे, शिक्षक सहकार संघटना धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब घेवारे सर उपस्थित होते.
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मध्ये तुळजापूर तालुक्यातील सात केंद्रामध्ये 1135 विद्यार्थी तर धाराशिव तालुक्यातील केशेगाव केंद्रामध्ये 290 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये केशेगाव केंद्रातील 10 विद्यार्थी तर तुळजापूर तालुक्यातील 78 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री ज्योतिर्लिंग क्षीरसागर, बाळासाहेब घेवारे,बालासाहेब चिवडे, अंगारखे सर, तुकाराम वाडकर,केशव काळे,शांताराम कुंभार, अजित माळी,अतुल माळी, बापू काळे, सोमनाथ जामगावकर, आरादवाड सर, विवेक खलाटे,मनीषा क्षीरसागर,यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविक केशव काळे यांनी तर आभार प्रदर्शन तुकाराम वाडकर यांनी केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.