मित्रत्व फाउंडेशन वर्ष 4 थे यांच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी अनोखे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा



धाराशिव : तुळजापूर येथील युवकांनी एकत्रित येऊन मित्रत्व फाउंडेशन स्थापन केलेले असून त्यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील आळणी येथील "स्वाधार मतीमंद मुलींच्या" शाळेत भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी १२१ मतीमंद मुलींना ड्रेस व स्वादिष्ट आहार देण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी अतिरीक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शफकत आमना, मा.अध्यक्ष, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव न्या.भाग्यश्री पाटील तसेच बालकल्याण सुरक्षा समितीचे सर्व सदस्य, प्रसिद्ध डॉ. शहापूरकर साहेब, धाराशिवचे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील व स्व-आधार संस्थेचे सचिव श्री.शहाजी चव्हाण सर व संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमासाठी मित्रत्व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी ॲड. प्रवीण लोमटे, आकाश जाधवर, तुषार देशमुख, किरण धोत्रे, ओंकार कावरे, रवी चौगुले, विशाल शिंदे, अनमोल शिंदे, सूरज विटकर, आकाश कदम, विश्वजित पवार व इतर सर्व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.