तुळजापूर शहरातील हैदराबाद बँके शेजारी मंगळवार पेठ येथील बंद असलेले व पडझड झालेले सार्वजनिक शौचालय पाडुन त्या ठिकाणी उद्यान करावे, सुरज बाळासाहेब जगताप यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 


 तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथील हैदराबाद बँके शेजारी, मंगळवार पेठ, येथील बंद असलेले व पडझड झालेले सार्वजनिक शौचालय पाडुन त्या ठिकाणी उद्यान करावे, अन्यथा दि. 14 ऑगस्ट 2025 पासुन नगर परिषद, तुळजापूर समोर आमरण उपोषण करणार असले बाबत, सुरज बाळासाहेब जगताप यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे,


दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथील हैदराबाद बैंके शेजारी मंगळवार पेठ भागातील रहिवासी असुन माझ्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हे बंद अवस्थेत असून मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, व कचराकुंडी मोडकळीस आलेली आहे, याचा त्रास अनेक दिवसापासून आम्हाला होत आहे. तसचे या भागातील जवळपास सर्व लोकांनी प्रत्येक कुटुंबाने घरी शौचालय बांधण्याकरिता नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडून रुपये 15 हजार रुपये घेतलेले आहेत, त्यामुळे सदरील बंद पडलेले शौचालय व कचराकुंडी काढून त्या ठिकाणी चांगले उद्यान बांधावे व त्यामध्ये लहान मुलांसाठी उद्यानामध्ये खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी ठेवावी, तसेच लोकांना फिरण्यासाठी त्या ठिकाणी गार्डन उभारण्यात यावा, जेणे करून शहराच्या सौंदर्यात भर पडुन हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे,

तरी नगरपरिषद तुळजापूर यांनी ते तात्काळ पाडून तेथे लवकरात लवकर त्या नगर परिषद मार्फत उद्यान बांधण्याबाबत काही ठोस निर्णय न घेतल्यास मी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी पासून नगर परिषद कार्यालय, तुळजापूर समोर आमरण उपोषणास बसणार आहे याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे,या निवेदनावर सुरज बाळासाहेब जगताप यांची स्वाक्षरी आहे.