भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी बोधले यांचा सत्कार



तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी 


भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी तुळजापूर येथील तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजी बोधले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज, माजी शहर प्रमुख उमेश गवते, तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, संस्कार भारती प्रदेश सह महामंत्री डॉ.सतीश महामुनी, श्री. महेश कुलकर्णी यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांचा फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष ही प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची जबाबदारी आपणास दिली आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, युवक नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आगामी काळात पक्षाचे निष्ठेने काम करू अशी प्रतिक्रिया दिली.