सांगवी मार्डी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक वानोळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण


 आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वानोळे सर यांच्या शुभहस्ते येथे 79 वा स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या नंतर ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण मुख्याध्यापक वानोळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रगीत,राज्यगीत येथील विद्यार्थिनी गायन केले,त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,यावेळी गावचे सरपंच युवराज बागल, उपसरपंच सतीश बागल,ग्रामपंचायत सदस्य, तसेच मुख्याध्यापक शाळेतील शिक्षक वृंद, व गावातील सर्व ग्रामस्थ,तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.