तुळजापूर शहरातील जय भारत तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती, लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न



शुक्रवार दि.5/8/25 रोजी.

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते,जय भारत तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. याप्रसंगी कै.धनश्री अनमोल साळुंके यांच्या स्मरणार्थ,अनमोल साळुंके यांनी दिलेल्या स्कूल बॅग व साहीत्यांचे वाटप लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी मा नगरसेवक राहुल भैय्या खपले,शामभाऊ पवार, सागर इंगळे,पिणू भोसले, राम मोगरकर तसेच मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश साळुंके,इंद्रजित साळुंके,भालेकर सर्व सभासद व महीला नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.