तुळजापूर येथे जागर आदिशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान सोहळा संपन्न.


तुळजापूर येथे जागर आदिशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान सोहळा लोकमंगल उद्योग समूह मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह शाखा तुळजापूर च्या वतीने व नवनिर्मिती प्रेरणा सामाजिक संस्था तुळजापूर च्या माध्यमातून तुळजापूर येथे संपन्न झाला यावेळी तुळजापूर येथे विविध क्षेत्रातील कार्यरत नवदुर्गा यांचा सन्मान करण्यात आला यावेळी वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या तुळजाभवानी नेत्रालयच्या नेत्रतज्ञ डॉक्टर गीतांजली माने मॅडम ग्रामीण रुग्णालयामध्ये अविरत गोरगरीब रुग्णांचे सेवा करणाऱ्या इन्चार्ज वैशाली पेंदे ग्रामीण रुग्णालय येथील परिचारिका दिपाली जगदाळे जळके मॅडम त्याचबरोबर अध्यात्माचे मोफत ज्ञान गीता अध्ययनाद्वारे महिला व लहान मुलांसाठी संकृत शिक्षण वर्ग महिलांना गीता पठनाचे धडे देणाऱ्या अश्विनी अनंत कोंडो तसेच पतीच्या निधनानंतर वकील क्षेत्रात आपला ठसा उमटवत दोन मुलांचे शिक्षण करत सामाजिक बांधिलकी जपत कोर्टामध्ये येणाऱ्या महिलांसाठी कमी खर्चात कोर्ट केसला मदत करणाऱ्या एडवोकेट शैलजा ताई पवार भजनी मंडळाच्या माध्यमातून समाज जनजागृती व प्रबोधन करणाऱ्या मनीषा चाटोफळे तसेच कोणाचाही आधार नसताना स्वकृत्वने दोन मुलांची शिक्षण त्यांच्या संगोपन करून धाडसाने अहोरात्र कष्ट करणाऱ्या गाड्या वरती उदरनिर्वाह करत संसाराचा गाडा हाकणाऱ्या लताबाई हरवाळकर झाली नवदुर्गांचा सन्मान अष्टभुजा उद्योग समूहाच्या संस्थापिका मिना सोमाजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लोकमंगल समूहाचे तुळजापूर शाखेतील कर्मचारी खंडेराव देवकर प्रशांत पवार व फजल सिद्दिकी उपस्थित होते संस्थेच्या संध्या खुरूद रूपाली घाडगे सारिका तेलंग सुनिता काळे उपस्थित होते.