तुळजापूर मधील न.प. चे मुख्याधिकारी स्वच्छता करून घेण्यास टाळाटाळ करीत असले बाबत, बालाजी तट यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

 


तुळजापूर शहरातील बालाजी रावसाहेब तट, यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर येथील जिजामाता नगर या परिसरात स्वच्छता करण्यास वारंवार अर्ज देऊन देखील न.प. चे मुख्याधिकारी राजकिय दबावापोटी स्वच्छतेची टाळाटाळ करीत आहेत. 



दिनांक 10/07/2025 रोजी सार्वजनिक महिलांच्या स्वाक्षरीत संडास, परिसर स्वच्छेतेसाठी अर्ज केलेला असून न.प. चे कर्मचारी व मुख्याधिकारी यांना तोंडी व लेखी सांगुन दुर्लक्ष करीत आहेत.साहेबांनी योग्य कार्यवाही करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनावर बालाजी तट यांची स्वाक्षरी आहे.