सेरेंटिका यांच्या पुढाकाराने पिंपळगाव रहिवाशांना मिळणार स्वच्छ पिण्याचे पाणी अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या शुभहस्ते आर ओ प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न
धाराशिव जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी तालुक्यातील पिंपळगाव ( क.) येथे आर ओ प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले. सेरेंटीका रिन्यूएबल्स यांच्या पुढाकाराने येथील रहिवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याच्या उद्देशाने सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पिंपळगाव कमलेश्वरी येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. सेरेंटिका रिन्यूएबल्स चे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण, वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
सेरेंटिका रिन्यूएबल्स हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यासह भुम आणि कळंब तालुक्यामध्ये हरित ऊर्जा निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय या आस्थापनाने डोळ्यापुढे ठेवले आहे.त्यांच्या पुढाकाराने पिंपळगाव कमलेश्वरी येथे प्रति तास २ हजार लिटर क्षमता असणारा आर ओ प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. यावेळी प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना धाराशिव जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या की सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याच्या प्रामाणिक उद्देशाने आर ओ प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. हरित ऊर्जा निर्मिती ही काळाची गरज आहे, आणि याच हरित ऊर्जेची निर्मिती हे आस्थापन करत आहे. हरित ऊर्जा निर्मितीचे कार्य करत असताना येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी हे आस्थापन घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते.
सेरेंटिका रिन्यूएबल्स हे आस्थापन सामाजिक बांधिलकी जपत हरित ऊर्जा निर्मितीचे कार्य करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये या कंपनीच्या वतीने तुळजापूर येथील श्री भवानी माता मंदिर परिसरामध्ये तब्बल ९ प्राथमोपचार केंद्रांवरती विनामूल्य औषध वाटप केले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, सेरेंटिका रिन्यूएबल्स चे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुरजित नारायण, वाशी चे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बरवे,माधव मोरे,उपसरपंच राजाराम जोगदंड, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, कालिदास जोगदंड जयंत जोगदंड, तुकाराम अहिरे,राम जोगदंड, शीतल जोगदंड, पुष्पा जोगदंड, रोहित नेटके, आदी प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.