तुळजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिक आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी निवडणूक तयारी, स्थानिक समस्यांवर उपाययोजना, तसेच संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस पक्षाचे पदाधिकारी, शहर व तालुका स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी तालुका अध्यक्ष: श्रीकृष्ण सूर्यवंशी, शहराध्यक्ष महेश भैया चोपदार,बबन गावडे, फिरोज भाई पठाण, दत्तात्रय हुंडेकरी,माजी नगरसेवक सुभाष कदम,राजाभाऊ चाटूफळे,आशुतोष कदम, काळू कदम,बाळू शिंदे, गोविंद देवकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
येत्या काही दिवसांत व्यापक प्रमाणात बैठक घेऊन पुढील दिशा ठरणार.
बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि लाडकी बहिण योजनेचा स्थानिक स्तरावर लाभ घेण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी, जनसंपर्क आणि स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.