अवैध मद्य विरोधी कारवाई : बेंबळी पोलिसांची धडक छापा मोहीम



धाराशिव (प्रतिनिधी):

बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवैध मद्य विक्रीविरोधात कारवाई करत देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.


दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.10 वाजता, रोमा हॉटेल समोर, धाराशिव येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रदीप इंद्रसिंग भट (वय 27 वर्षे, रा. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा व्यक्ती अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ सुमारे ₹3,26,980 किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या ठेवलेला आढळला.


पोलिसांनी सदर दारूचा साठा तात्काळ जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.


या कारवाईमुळे बेंबळी पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.