नंदगाव जिल्हा परिषद गटातून बालाजी भैय्या सराटे यांची उमेदवारीसाठी तयारी


तुळजापूर तालुक्यातील सलगरा (मड्डी) येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते, मा. तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्री. बालाजी (भैय्या) उत्तरेश्वर सराटे हे नंदगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढविण्यास इच्छुक आहेत.


बालाजी सराटे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून युवकांच्या हक्काच्या रोजगारासाठी सतत लढा देत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे केली, तसेच मंत्रालयात जाऊन मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली आहेत.


ते जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होत असून, केवळ वीसाव्या वर्षी त्यांनी गावच्या तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष पद अतिशय जबाबदारीने सांभाळले आहे. शासनाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ग्राम आदिशक्ती समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे.


नंदगाव गटात बालाजी भैय्या सराटे यांचा मोठा जनसंपर्क व प्रभाव असून, ते सुशिक्षित, उच्चशिक्षित, तडफदार व कार्यक्षम असल्यामुळे युवक वर्गाकडून आणि मित्र परिवाराकडून त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे.


युवा पिढीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले बालाजी भैय्या सराटे हे युवा पर्व उभे करण्याच्या निर्धाराने जनतेशी जोडलेले कार्य करत आहेत.