काटगाव पंचायत समिती गण हा स्त्री (जनरल महिला) राखीव गण आहे.या गणातून मी इच्छुक उमेदवार आहे. मी सौ. गोदावरी वैजिनाथ धर्मराज बिराजदार (भाऊजी),मागील तीस वर्षांपासून काटगाव येथे वास्तव्य आहे.गावातील प्रत्येक घराशी माझा घनिष्ठ जनसंपर्क आहे,काटगाव गावामध्ये गेल्या दहा वर्षांपासून माझं किराणा दुकान चालवते आहे.त्यामुळे सर्व गावकऱ्यांशी माझे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत.
मी या गावातीलच लेक-माणूस असून, गावात माझे अनेक नातेवाईक संबंध आहेत.
तसेच माझ्या ज्येष्ठ मुलीचे लग्न देखील या गावातीलच पावले परिवारात झाले आहे.
गेल्या निवडणुकीत मी काटगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी केली होती.
मी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणारी निष्ठावान शिवसैनिक आहे.
सन 1990 पासून आजपर्यंत मी शिवसेना पक्षासाठी सक्रिय कार्य करत आहे.
उद्या मी माझ्या कार्याची संपूर्ण माहिती देणारी सविस्तर पोस्ट करणार आहे,
जेणेकरून सर्व शिवसैनिक बांधवांना माझ्या कार्याची जाण होईल.
तसेच माझे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी — खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख
यांनाही माझ्या कार्याचा अहवाल देणार आहे.
---


