सिंदफळ गटातून जनतेचा आवाज बनण्यासाठी सौ. शितल तानाजी कांबळे सज्ज.

 



सिंदफळ परिसरातील जनतेच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणणारी एक संवेदनशील, तळागाळातील कार्यकर्ती म्हणून सौ. शितल तानाजी कांबळे यांनी जनसेवेचा ध्यास घेतला आहे.

सिंधफळ गटातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.


जनतेच्या सहभागातून, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्याच्या उद्देशाने त्या जिल्हा परिषद सदस्यपदासाठी सिंदफळ गटातून इच्छुक आहेत.

“सामान्य माणूस... असामान्य ताकद” या घोषवाक्याच्या आधारे त्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून कार्य करण्यास तत्पर आहेत.


सामाजिक बांधिलकी, प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासावर उभारलेला हा प्रवास जनसेवेचा दीप प्रज्वलित करणारा ठरेल, असा विश्वास त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



---


भावी जिल्हा परिषद सदस्य – सिंदफळ गट

🌸 सौ. शितल तानाजी कांबळे, सिंदफळ.