सिंदफळ पंचायत समिती गणातून सौ. नंदा राम मुगुटराव यांची उमेदवारीची जोरदार मागणी.

 














तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. नंदा राम मुगुटराव यांनी सिंदफळ पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची मागणी अधिकृतपणे व्यक्त केली आहे. त्यांच्या या उमेदवारीच्या मागणीस स्थानिक पातळीवर तसेच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


सौ. मुगुटराव या गेली दहा-बारा वर्षे तुळजापूर तालुक्याचे आमदार मा. राणा जगजितसिंह पाटील यांच्या विश्वासू व कट्टर कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केवळ पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा राखली नसून, पक्षाच्या प्रत्येक लढाईत, मोहिमेत आणि संघटनात्मक उपक्रमांत आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रामाणिक, संयमी आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना जनतेत विशेष ओळख मिळाली आहे.


सांगवी मार्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या काळात सौ. मुगुटराव यांनी अनेक विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. ग्रामपातळीवर पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी स्वयंमदत गट, तसेच युवकांसाठी विविध रोजगाराभिमुख योजना राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीने विकासाच्या नवीन पातळीवर वाटचाल केली.


पंचायत समिती पातळीवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे, स्थानिक प्रश्नांना आवाज मिळावा आणि गावोगावी विकासाची गती वाढावी यासाठी सौ. नंदा मुगुटराव या पुढे सरसावल्या आहेत. 


आमदार मा. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सौ. नंदा मुगुटराव यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्या पुढे आल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सौ. नंदा मुगुटराव या पंचायत समितीवर गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, “विकास, विश्वास आणि प्रामाणिकपणा” हेच आपले ब्रीदवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.