OBC महिला प्रवर्गातून वडगांव काटी सरपंच सौ. पूनम कोडगिरे यांची (उबाठा) शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी


वडगांव काटी (ता. तुळजापूर) — काटी जिल्हा परिषद गटातील OBC महिला प्रवर्गातून वडगांव काटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. पूनम गौरीशंकर कोडगिरे यांनी शिवसेना पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

ही उमेदवारीची मागणी युवा नेते ऋषिकेश (भैय्या) मगर यांच्या मार्फत करण्यात आली असून, यासाठी सौ. कोडगिरे यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांमुळे सौ. कोडगिरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उमेदवारीस स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत त्यांना मजबूत जनाधार लाभेल, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त केला जात आहे.