सावरगाव पंचायत समिती गणातून,ऋषी भैय्या मगर यांच्या माध्यमातून गौरीशंकर कोडगिरे यांची, (उबाठा) शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी


सावरगाव पंचायत समिती गणातून ऋषी भैय्या मगर यांच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा) पक्षाकडे वडगाव काटी येथील समाजसेवक गौरीशंकर कोडगिरे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आगामी तुळजापूर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोडगिरे यांनी कार्यकर्त्यांसह जय्यत तयारी सुरू केली असून स्थानिक पातळीवर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. गावोगावी दौरे, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनसंपर्क यांना वेग आला, असून मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.