“कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट.”

  




मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस उप निरीक्षक जाकिर पटेल, पोलीस हावलदार- तेलप, पवार तसेच महिला पोलीस हावलदार- सोनाली जाधव, महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ, पिंक पथक बीट अंमलदार संजय राठोड , वैशाली कोरे, आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने आज दि.08 नोव्हेंबर रोजी 09.30 ते 10.40 वा. सु. सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली. त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सायबर आवरनेस तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालय शाळेचे 925 विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक वृंद, कर्मचारी माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.