तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी महंत ईच्छागिरी महाराज यांचे नाव चर्चेच्या अग्रस्थानी



तुळजापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महंत ईच्छागिरी महंत यांचे नाव सध्या शहरात प्रचंड चर्चेत आहे. तुळजापूर शहरांतील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना शहराचा शाश्वत विकास, स्वच्छता, सुव्यवस्था आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्याचे दुरदृष्टी नेतृत्व म्हणून सर्वसामान्य जनता महंत ईच्छागिरी महाराज यांच्याकडे आशेने पाहत आहे.


गेल्या दहा वर्षांपासून तुळजाभवानीच्या पावन नगरीत मटका, दारु, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय यांसारख्या अवैध धंद्यांनी थैमान घातल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी दावेदारी करणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांविषयी लोकांमध्ये असंतोष असून, त्यांना जनतेचा पाठिंबा मिळण्यात अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पारदर्शक सुशासन, प्रामाणिक प्रशासन आणि धर्माधिष्ठित नेतृत्वाचे प्रतिक म्हणून महंत ईच्छागिरी महाराज यांच्या नावाभोवती नागरिकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.

 या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षित उमेदवार म्हणुन महंताकडे पाहिले जात आहे , महारांजांचे विधिज्ञ ( LLB ) कायद्यांचे शिक्षण पुर्ण केले असुन, वकीली क्षेत्रात दिल्ली व पुणे येथील हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे.

आगामी काळात तुळजापूर शहरात विकासाभिमुख, सक्षम आणि नैतिक मूल्यांवर आधारित नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.