महाराष्ट्रात पहिल्यांदाच आरण येथे,भव्य महालक्ष्मी महायज्ञाचे आयोजन, पूज्य गुरुदेव १०८ महंत राहुल मुनी महाराज यांच्या कृपेने दिव्य महालक्ष्मी महायज्ञाची तयारी जोरात





भव्य श्री महालक्ष्मी महायज्ञ – अरण, सोलापूर जिल्हा


अरण (ता. माढा, जि. सोलापूर) — पूज्य गुरुदेव १०८ महंत राहुल मुनी महाराज यांच्या अखंड कृपा आशीर्वादाने, महाराष्ट्राच्या भूमीत प्रथमच एक अद्वितीय आणि दिव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.




अरण येथील ऐतिहासिक महाकाली मंदिरात १९ मार्च ते २९ मार्च २०२६ या चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात

११ दिवसीय “भव्य श्री महालक्ष्मी महायज्ञ” भव्य उत्साहात संपन्न होणार आहे.


या महायज्ञाचे विशेष आकर्षण म्हणजे ११,००० दिव्य श्री महालक्ष्मी कलशांचे वैदिक पद्धतीने सिद्धीकरण.

प्रत्येक कलश १ कोटी महालक्ष्मी मंत्रजप व १० लाख आहुतींनी सिद्ध केला जाणार असून त्यात ३५१ पवित्र वस्तूंचा समावेश आहे.


या वस्तूंमध्ये—


५२ शक्तीपीठांचे हळदी-कुंकू, १२ ज्योतिर्लिंगांचे पवित्र भस्म,


अष्टविनायकांचा गंध, चांदीचा महालक्ष्मी शिक्का, दक्षिणवर्ती शंख,


वास्तु यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, कुबेर यंत्र,


तसेच ३२ रत्न, ३२ उपरत्न आणि ३२ हीलिंग जेमस्टोनचा समावेश आहे.


या यज्ञासाठी ७,००० किलो देशी गायीचे तूप, ३०,००० किलो मेवे, २०,००० किलो चंदनाची लाकडे वापरली जाणार असून १ कोटी महालक्ष्मी कुमकुम आर्चना आणि १० लाख आहुती दिल्या जाणार आहेत.


🪔 या दिव्य अनुष्ठानाचे फल:


घर, व्यापार व जीवनात सुख-शांती आणि समृद्धीचा अखंड प्रवाह निर्माण होईल.


वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्मिक तेज वाढेल.


सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होईल.



🙏 सर्व भक्त, श्रद्धावान व नागरिकांनी या अद्वितीय दिव्य महायज्ञात सहभागी होऊन

श्री महालक्ष्मी अष्टलक्ष्मी कलश प्राप्त करून महालक्ष्मीचे अखंड आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


📍 स्थळ: महाकाली मंदिर, अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर

📅 दिनांक: १९ मार्च ते २९ मार्च २०२६

🌺 “श्री महालक्ष्मीच्या कृपेने सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो!”