सिंदफळ ZP गटातून शितल आनंद ढाले यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी स्थानिक विकासासाठी शितल ढाले यांचा भाजपकडे दावा


तुळजापूर तालुक्याचे आमदार तसेच भावी पालकमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच भावी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सज्जन मामा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उमेदवारी मागणार असल्याचे शितल आनंत ढाले यांनी स्पष्ट केले.


सिंदफळ –

सिंदफळ जिल्हा परिषद गटातून आपला विकासमार्ग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आपण भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणार असल्याचे ढाले यांनी सांगितले. स्थानिक विकास, महिलांचे सबलीकरण, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.


सिंदफळ गटातील वाढत्या जनसमस्या, रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांच्या अडचणी, मुद्गलेश्वर मंदिराच्या सर्वागीण विकासासाठी तसेच पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील सर्वांना न्याय देणे, पारदर्शकता ठेवणे आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपण अधिकृतपणे उमेदवारीची मागणी करणार असून, गटातील नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा आपल्या कार्याला अधिक बळ देत असल्याचे ढाले यांनी सांगितले.