तुळजापूरचे युवा उद्योजक राजू मधुकर भोसले यांचा भाजपात प्रवेश; राणा पाटील–पिटू गंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास समाजसेवक राजू भोसले भाजपात; तुळजापूरात युवा शक्तीला नवी दिशा
तुळजापूर शहरातील युवा उद्योजक व समाजसेवक श्री. राजू मधुकर भोसले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार श्री. राणा जगजितसिंह पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि युवा नेते श्री. विनोद (पिटू) गंगणे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनावर विश्वास ठेवत त्यांनी भाजपाचा भगवा स्वीकारला.
श्री. राजू भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, जनसंपर्क आणि युवकांना स्वावलंबनाकडे नेणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. तुळजापूर शहरातील विविध भागात त्यांनी राबविलेल्या सामाजिक कार्याची व्यापक दखल घेतली जात असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या युवा संघटनांना नवी उर्जा मिळणार आहे.
या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना श्री. राजू भोसले म्हणाले की, “तुळजापूरचा विकास, रोजगाराच्या संधी आणि युवकांना न्याय मिळण्यासाठी मी भाजपाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार केला आहे.”
आमदार राणा पाटील यांनी भोसले यांच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, तुळजापूरच्या विकासासाठी समर्पित कार्यकर्त्यांची साथ मिळणे ही आनंदाची बाब आहे. युवा नेते विनोद पिटू गंगणे यांनीही राजू भोसले यांच्या प्रवेशाला शुभेच्छा देत आगामी काळात त्यांच्यासोबत भक्कमपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
तुळजापूर शहरातील राजकीय वातावरणात या प्रवेशामुळे विशेष चर्चेला उधाण आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.