अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुटखाबंदी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. आरोपी रमेश नागनाथ गंजे, रा. गंजेवाडी ता. तुळजापूर, जि. धाराशिव (हमु. तामलवाडी) यांनी दिनांक 04.12.2025 रोजी सायं. 4.25 वाजता गंजेवाडी येथील त्यांच्या राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याची माहिती पथकास मिळाली.


कारवाईदरम्यान पोलिसांना खालील प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला—

डॉयरेक्टर पान मसाला, प्रिमियम टोबॅको, विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखू इत्यादी प्रतिबंधित उत्पादने.

जप्त करण्यात आलेल्या या मालाची एकूण किंमत ₹97,140 इतकी आहे.


याप्रकरणी संबंधित गुटखा साहित्य ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

भा.दं.सं. कलम 123, 223, 274, 275

अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(9), 30(2)


तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.