२९ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांचा पदग्रहण सोहळा लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा सोमवारी भव्य पदग्रहण समारंभ




तुळजापूर :

सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता तुळजापूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त लाडके नगराध्यक्ष मा. विनोद (पिंटू) गंगणे यांचा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.




या पदग्रहण सोहळ्यास

देविचे मुख्य महंत पूज्यनीय तुकोजी बाबा,

देविचे मुख्य महंत पूज्यनीय वाकोजी बाबा,

तसेच लोकप्रिय आमदार मा. राणाजगजितसिंह (दादा) पाटील

यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

नगराध्यक्ष मा. विनोद (पिंटू) गंगणे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या पदग्रहण सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.