वाढत्या उष्णतेवर उपाय : शेतकरी व गोरगरिबांसाठी ‘नैसर्गिक वातानुकूलित घर’ प्रकल्प – दिपक लिंबाजी राठोड


तुळजापूर | प्रतिनिधी

देशात वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेमुळे मानवाच्या आरोग्यावर व शेतीवर गंभीर परिणाम होत असून, 2026 चा उन्हाळा अत्यंत भयानक ठरणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व गोर-गरीबांसाठी कमी खर्चात नैसर्गिक वातानुकूलित निवास व्यवस्था उपलब्ध करून देणारा अभिनव प्रकल्प सिव्हिल इंजिनिअर दीपक लिम्बाजी राठोड यांनी सादर केला आहे.

2025 मध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, भविष्यात हे तापमान 50 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी दिवसभर शेतात काम करणे अशक्य होत असून, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके पिकण्याआधीच करपत असल्याचे चित्र दिसत आहे.

या सर्व समस्यांचा सखोल अभ्यास करून Civil Engineering तंत्रज्ञानाच्या आधारे नैसर्गिकरित्या थंडावा देणारे छोटे ब्लॉक्स/घरांचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत पुढील संरचना प्रस्तावित आहेत –

Load Bearing Structure – अत्यंत कमी खर्चात

Frame Structure – कमी खर्चात

Frame Structure + Fabrication – परवडणाऱ्या खर्चात

चौथा प्रकल्प – प्रगतीपथावर

हे नैसर्गिक वातानुकूलित ब्लॉक्स शेतात उभारल्यास शेतकरी उन्हाळ्यातही दिवसभर शेतात राहून शेती करू शकणार असून, शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण भागात येऊन नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भावी पिढीमध्ये शेतीविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल.

आज शहरी भागात वाढत्या तापमानामुळे एसीवर अवलंबून राहावे लागत असून, त्याचे गंभीर आरोग्यदुष्परिणाम जाणवत आहेत. याउलट ग्रामीण भागातील लोक नैसर्गिक जीवनशैलीमुळे सरासरी पाच वर्षे अधिक आयुष्य जगत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.

हा प्रकल्प लवकरच गोरगरीब व शेतकऱ्यांच्या सेवेत आणण्यात येणार असून, वाढत्या उष्णतेला सामोरे जाण्यासाठी हा एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे, असा विश्वास दीपक राठोड यांनी व्यक्त केला.

 दिपक लिंबाजी राठोड

Civil Engineer

M.Tech (Structural Engineering)

PhD – Final Year (Pursuing)