तुळजापूर नगरपालिकेतील नूतन नगरसेवकांकडून किरण यादव यांचा सत्कार महाविकास आघाडीच्या एकनिष्ठ प्रचाराची दखल; किरण माणिकराव यादव सन्मानित


तुळजापूर शहरातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले नूतन नगरसेवक अमोल भैया कुतवळ, नूतन नगरसेवक आनंद मालक जगताप, नूतन नगरसेवक,नूतन नगरसेवक रणजीत भैया इंगळे, नूतन नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर, तसेच चिन्मय मगर यांच्या वतीने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते किरण माणिकराव यादव यांचा सत्कार करण्यात आला.

महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर उपाध्यक्ष म्हणून किरण माणिकराव यादव यांनी निवडणूक काळात एकनिष्ठपणे व प्रामाणिक प्रचारकार्य केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन नूतन नगरसेवकांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेवकांनी सांगितले की, पक्षाच्या विजयामागे कार्यकर्त्यांची मेहनत, निष्ठा व जनतेशी असलेला थेट संपर्क महत्त्वाचा ठरला आहे. पुढील काळातही सर्वजण मिळून तुळजापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.