पोलीस स्टेशन नळदुर्गचे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन



 पोलीस स्टेशन नळदुर्गचे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन


नागरिकांनी खालील सूचना पालन करून शेतकरी बांधवांचा "वेळा-अमावस्या" हा सण सुरक्षित व आनंददायी पद्धतीने साजरा करावा.


गावातील व परिसरातील सर्व नागरिकांना नळदुर्ग पोलीस प्रशासनामार्फत कळविण्यात येते की, वार शुक्रवार, दिनांक 19/12/2025 रोजी शेतकरी बांधवांचा पारंपरिक उत्सव "वेळा-अमावस्या" साजरा केला जातो. या दिवशी अनेक नागरिक वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी शेताकडे जात असतात. अशा वेळी काही समाजकंटक या संधीचा गैरफायदा घेत चोरीचे प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घ्यावी.


महत्वाच्या सूचना :


• शेताकडे जात असताना घरामध्ये किमान एक तरी व्यक्ती उपस्थित ठेवावी.


• घराची सर्व दारे व खिडक्या नीट कुलूपबंद करावीत.


• घरातील मौल्यवान दागिने, रोकड व महत्वाच्या वस्तू शक्यतो स्वतःसोबत बाळगाव्यात.


• परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती (चेहऱ्यावर कापड बांधलेली) किंवा संशयित वाहन (नंबर प्लेट नसलेले / परजिल्ह्यातील) आढळल्यास त्याबाबत चौकशी करावी.


• कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस पाटील, बीट अंमलदार किंवा डायल 112 वर संपर्क साधावा.


नळदुर्ग पोलीस प्रशासन सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे.



---


श्री. सचिन चंद्रकांत यादव

पोलीस निरीक्षक

पोलीस स्टेशन नळदुर्ग

मो. नं. : 9049234303