स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील जयंतीनिमित्त धाराशिव येथे विनम्र अभिवादन


धाराशिव :

स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे आईसाहेब स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


संवेदनशील, कर्तृत्ववान व स्वभावाने प्रेमळ असणाऱ्या आईसाहेब स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पाटील यांचे स्मरण नेहमीच आम्हाला नवी ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.


आईसाहेबांच्या आदर्श व प्रेरणेतून, आ. डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच आ. मल्हारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र अविरत व अखंडपणे कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू विद्यार्थी प्रशासनाच्या सेवेत दाखल होत असून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देत आहेत.


आईसाहेबांचे आशीर्वाद, विचार व प्रेरणा सदैव आम्हाला लाभोत, अशी भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन कार्यक्रमास विठ्ठल गायकवाड, अजित खापरे, स्वानंद पाटील, अशोक गाडे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.