धाराशिव जिल्ह्यात अनेक हरित ऊर्जा प्रकल्प सुरु आहेत.राज्य आणि देशाच्या प्रगतीच्या अनुषंगाने हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे ठरत आहेत.सदर प्रकल्पांना अनाठाई विरोध करण्याच्या नादात एका उमद्या तरुणाला हकनाक जीव गमवावा लागल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तूळ) येथे ही घटना घडली आहे.
या प्रकरणामध्ये विद्याधर तानाजी जाधव व जितेंद्र गुलाब मस्के (दोघेही राहणार देवसिंगा तूळ तालुका तुळजापूर ) हे जबाबदार असल्यामुळे यांना अटक करावी अशी मागणी मृत तरुणाच्या बहिणीने केली आहे.तक्रारदार निकिता अक्षय मस्के यांचा भाऊ दत्ता हब्बास वाघमारे (वय २५ वर्षे ) याचा मृत्यू झाला आहे. दत्ता मजुरी मिस्त्री व बांधकामाच्या ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास विद्याधर जाधव हा त्यांच्या घरी आला. त्याने आपल्या शेतातून रिन्यू कंपनीच्या वीज तारा गेलेल्या असून अजूनही मोबदला मिळाला नसल्याने त्या तारा तोडण्याचे काम करायचे आहे असे सांगितले.
दत्ता हा इलेक्ट्रिशियन नसल्याने व कामाचा अनुभव नसल्याने त्याने प्रथम या कामावर जाण्यास नकार दिला. मात्र "या तारांमध्ये विद्युत प्रवाह नाही तसेच या तारा तोडण्यासाठी कंपनीची परवानगी घेतलेली आहे" असे खोटे सांगून व हजेरीपोटी पाचशे रुपये देत त्याला सोबत नेले. त्यानंतर ग्रामपंचायतीची शिडी लावून रिन्यू पवन चक्की कंपनीच्या पोलवर दत्ता यास चढविण्यात आले. पोलवर चढताच दत्ता याला चोराचा विद्युत धक्का बसून तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम तुळजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात व नंतर धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वीज प्रवाह सुरू असलेल्या तारांवर मुद्दाम तरुणाला चढवून त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोघांना सदोष मनुष्य वधाच्या गंभीर कलमाखाली अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत्यू पावलेल्या दत्ता वाघमारे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे देवसिंगा तूळ परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे करत आहेत.
या गंभीर प्रकरणाच्या मुळाशी पुनर्वापरायोग्य विद्युत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवणे हा हेतू दिसून येतो. यापूर्वी देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारामध्ये रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स यांच्या साइटवरून एक लाख रुपये किमतीचे आर्थिंग केबल, केबल कटिंग, टॉवर डोअर लॉक, स्काडा अर्थिंग स्ट्रीप चोरी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. अन्य एका प्रकरणामध्ये वाशी तालुक्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीने एक लाख दहा हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान केल्याची तक्रार पोलीस ठाणे वाशी येथे दाखल करण्यात आली आहे.सदरहू व्यक्तीने कंपनीकडे साडेचार लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे.
२०३० पर्यंत ऊर्जा निर्मितेचे ध्येय्य डोळ्यापुढे ठेवत ऊर्जा मंत्रालय कार्य करत आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः ऊर्जा निर्मिती प्रकल्पांवरती लक्ष ठेवून आहेत.मे महिन्यात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये अशी निरीक्षणे नोंदविण्यात आली होती की वीज ही आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. सध्या महाराष्ट्राची विद्युत मागणी ३०,६५९ मेगावॅट इतकी आहे.२०३५ पर्यंत सुमारे ४५,००० मेगावॅट इतकी अपेक्षित मागणी आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. थर्मल पॉवरमधून २,६८३ मेगावॅट, हायड्रो पॉवरमधून १,१७० मेगावॅट व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांमधून ३५,१७० मेगावॅट वीज उपलब्ध होण्यासाठी करार केला आहे. याशिवाय नॉन-सोलर वेळेतील मागणी भागवण्यासाठी ४,५७४ मेगावॅट स्टोरेज क्षमतेचे नियोजन आहे. साधन पर्याप्तता योजनांमधून २०२९-३० पर्यंत ८०,२३१ मेगावॅट आणि २०३३-३४ पर्यंत ८६,०७० मेगावॅट अंतर्गत क्षमता वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नवीकरणीय ऊर्जेवर विशेष भर देत आहे. यामुळे ‘नेट झिरो ट्रांझिशन’ शक्य होईल व वीज खरेदीत मोठी बचत होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही जगातील सर्वात मोठी वितरीत नवीकरणीय ऊर्जा योजना आहे. अशा प्रकारे, शेतीसाठीची रात्रीची वीज मागणी टप्प्याटप्प्याने दिवसा सौरऊर्जेच्या वेळेत आणली जात आहे.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या वीज वितरणासाठी सक्षम वितरण नेटवर्क आवश्यक आहे.यासाठी रु. ६५,००० कोटींची वितरण प्रणाली मजबूत करणारी योजना तयार केली आहे. याशिवाय पारेषण क्षेत्रात रु. ७५,००० कोटींची गुंतवणूक देखील नियोजित आहे.उन्हाळ्यातील वाढीव मागणी भागवण्यासाठी पुरेशी वीज खरेदी करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आपल्याकडे पुरेशी वीज उपलब्ध आहे. प्रधानमंत्री यांनी Reforms-based, Results-linked Distribution Sector Scheme (RDSS) सुरु करून वितरण क्षेत्र मजबूत करण्याचे कार्य हाती घेतले आहे.महाराष्ट्र हे या योजनेच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. परंतु असे असले तरी देखील धाराशिव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यामध्ये समोर आलेली प्रकरणे निश्चितच उत्साह वर्धक नाहीत.
प्राप्त परिस्थितीमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचा वापर व त्यापोटी द्यावयाचे मूल्य याबाबत अधिक पारदर्शकता आणावी लागेल तसेच विविध ऊर्जा प्रकल्प साकार करणाऱ्या आस्थापनांना चोख सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी लागेल.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.