सांगवी मार्डी ग्रामपंचायतीकडून जाहीर आवाहन
ग्रामस्थांसाठी सुवर्णसंधी – थकबाकी भरा, ५०% कर सवलत मिळवा!
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना मोठी दिलासा देणारी योजना जाहीर!
१ एप्रिल २०२५ पूर्वीची मालमत्ता कर थकबाकी
तसेच चालू बाकी – ३१ डिसेंबर २०२५ अखेर
एकरकमी भरल्यास मिळणार सरळ ५०% कर सवलत!
---
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय – निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी संधी!
ग्रामपंचायत सांगवी मार्डी येथील सर्व थकबाकीदार ग्रामस्थांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कर थकबाकी वेळेत भरल्यास ५०% पर्यंत कर सवलतीचे लाभ आपणास त्वरित मिळणार आहेत.
---

