तुळजापूर (दि.१०) येथील श्री तुळजाभवानी मंदिरा जवळ पंढरपूरकर गल्लीतील रस्त्यावर अनधिकृतरित्या २४ तास दुचाकी गाड्यांचा विळखा घातला असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना घरी ये-जा करण्यासाठी पायी रस्ता उपलब्ध नाही याबाबत पंढरपूरकर गल्लीतील रहिवासाने वारंवार प्रशासनाकडे लिखित तोंडी पाठपुरावा केला परंतु अद्याप यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे दिसून येते याप्रकरणी तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ यावर या परिसरातील ३०८ नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता तसेच हे समस्या दूर न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
सहाय्यक निवडणूक अधिकारी त्यांच्या लेखी आश्वासनानंतर मतदानावरील बहिष्कार पाठीमागे घेण्यात आला २८ नोव्हेंबरच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागातती विकासाकडे व बहुतेक बहुतेक मूलभूत व भौतिक सुविधा कडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे याबद्दल स्थानिकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे लोकशाही मार्गाने न्याय मागूनही न्याय मिळत नसल्याबाबत स्थानिकाने खंत व्यक्त केली
सुवर्णेश्वर गणपती पासून मेन रोड येथील शहापूर यांच्या घरापर्यंत जवळपास ४०० हून अधिक दुचाकी वाहनांचे अतिक्रमण गर्दी पंढरपूरकर गल्लीत होते यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी, भवानी रोड येथील व्यापारी व भाविक यांचे दुचाकी वाहन लागतात ही वाहने २४ तास लागलेली असतात यामुळे येथील ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाही वेळेवर उपचार न मिळाल्यास एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
तरी संबंधित विभाग प्रमुखांनी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन किमान स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरी ये जा करण्यासाठी पायी रस्ता तरी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पंढरपूरकर गल्लीतील रहिवाशाकून होत आहे. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा आत्मदहन करावे लागेल असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.