NMMS परीक्षेत सरस्वती विद्यालय तामलवाडीचे घवघवीत यश, ९ विद्यार्थी उत्तीर्ण कु. मगर मानसी मिलिंद 120 गुणांसह प्रथम, विद्यालयाचा मान उंचावला.

 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत सरस्वती विद्यालय, तामलवाडी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या यशामध्ये कु. मगर मानसी मिलिंद हिने 120 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या यशामुळे विद्यालय, पालक व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही विशेष कौतुक करण्यात आले आहे.