सांगवी मार्डी येथे ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिराच्या शिखराचे रंगकाम पूर्ण. सांगवी मार्डी येथे ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिराच्या शिखराला रंगरंगोटी श्री गोविंद रामचंद्र जाधव यांच्या पुढाकारातून मंदिर शिखराचे रंगकाम पूर्ण

 


तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिराच्या शिखराचे रंगकाम श्री गोविंद रामचंद्र जाधव यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले आहे. मंदिराच्या शिखराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
श्री जाधव यांनी श्रद्धा आणि सेवाभाव जपत ग्रामदैवताच्या सेवेसाठी हा उपक्रम हाती घेतला. या कामामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मंदिर परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक बनला आहे. ग्रामस्थांनी श्री गोविंद रामचंद्र जाधव यांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
मंदिर हे गावाच्या श्रद्धा व संस्कृतीचे केंद्रस्थान असल्याने अशा उपक्रमांमुळे धार्मिक व सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.