नळवाडीत लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन


लोहारा प्रतिनिधी – उमरगा तालुक्यातील नळवाडी येथे परंपरेने सुरू असलेल्या अखंड भावार्थ रामायणाच्या निमित्ताने “लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक परंपरेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
“याने सीता शोध केली! रामे सीता भेटविली!! द्रोणागिरी तो आणियला! लक्ष्मण वाचविला!!” या भावार्थानुसार साकारण्यात येणारा हा सोहळा नळवाडीच्या पावन भूमीत दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात वाचक, प्रवचनकार तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन गावचे पोलिस पाटील बंकट चव्हाण, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.