तुळजापूरात श्रीराम नवमी निमित्त भगवाध्वज यात्रेसाठी आज महत्वाची बैठक

तुळजापूर : शहरातील प्रभू श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भगवाध्वज यात्रेच्या नियोजनासाठी आज दि. 25 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही भगवाध्वज यात्रा उद्या दि. 26 रोजी प्रभू श्रीराम मंदिर ते महाद्वार या मार्गाने काढण्यात येणार असून, यात्रेचे नियोजन, शिस्त व यशस्वी आयोजन याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
सदर बैठक नगर परिषद कार्यालय, तुळजापूर येथे होणार असून, शहरातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष विनोद (पिटूभैय्या) गंगणे यांनी केले आहे.
— विनोद (पिटू भैय्या) गंगणे
नगराध्यक्ष, नगर परिषद तुळजापूर