धाराशिव : बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय पोषण आहार समितीशी संबंधित लाच मागणी व स्वीकार प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरण (Spe. Case No. 97/2018, गुन्हा नोंद क्र. 96/2018) अंतर्गत चालू होते.
या प्रकरणात शालेय पोषण आहार समिती अध्यक्ष सौ. शोभा गायकवाड, त्यांचे पती सुधीर गायकवाड व तुकाराम उंबरे यांच्यावर ₹20,000 लाच मागणी व ₹10,000 स्वीकारल्याचा आरोप होता. मात्र, न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले.
⚖️ प्रकरणाचा तपशील
सन 2016-17 व 2018-19 या कालावधीत तक्रारदारास शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. हे काम चालू ठेवण्यासाठी किंवा काढून टाकण्याच्या संदर्भात आरोपींकडून लाच मागण्यात आल्याची तक्रार ACB कार्यालयाकडे करण्यात आली होती.
तक्रारीनुसार, तडजोडीनंतर ₹15,000 देण्याचे ठरले होते. ACB ने सापळा रचून तुकाराम उंबरे यांच्या मार्फत ₹10,000 स्वीकारल्याचा गुन्हा नोंद केला होता.
सरकार पक्षाचे पुरावे
सरकार पक्षाने खालील साक्षीदार व पुरावे न्यायालयात सादर केले:तक्रारदार व त्यांची पत्नी
पंच साक्षीदार
ऑडिओ रेकॉर्डिंग
पोलिस अधिकारी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Sanction Authority)
चौकशी अधिकारी
बचाव पक्षाचा युक्तिवाद
आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत खालील मुद्दे मांडले:तक्रारदाराकडून अन्न निकृष्ट दर्जाचे व स्वच्छतेअभावी तक्रारी
बोगस करारनामा व खोट्या नोटरीचे कागदपत्र सादर
संबंधित कालावधीत काम मंजूर नसल्याचा दावा
₹20,000 ही उसनी रक्कम असल्याचा मुद्दा
वैमनस्यातून खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप
ACB मार्फत कट रचल्याचा दावा
अभियोजन परवानगी (Sanction) त्रुटीपूर्ण असल्याचे निदर्शनास आणले,

