धाराशिव : (प्रकरण क्रमांक Spe. Case No. 67/2023, सरकार विरुद्ध रोहित खंदारे, गुन्हा नोंद क्रमांक 270/2023) या पॉक्सो प्रकरणात विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम 363, 366-A, 376(2)(n), 376(2)(j), 376(3) तसेच ‘The Protection of Children from Sexual Offences Act, 2012’ अंतर्गत कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा उलटतपास करताना आरोपीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयासमोर अधोरेखित केले. तसेच, सरकार पक्षाचे साक्षीदारही फिरले असून त्यांनी आरोपांना समर्थन दिले नसल्याचे स्पष्ट झाले. ॲड. साखरे यांनी न्यायालयासमोर मांडले की, सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा दाखला देत आरोपीविरुद्ध ठोस पुरावा नसल्याची भूमिका सक्षमपणे मांडली. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय विशेष जिल्हा न्यायाधीश श्री आवटी साहेब pocso प्रकरणात यांनी पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता जाहीर केली. या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.