![]() |
तुळजापूर : तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन सोपान भोसले यांना ए. डी. फाउंडेशनच्या वतीने “आदर्श समाजसेवक” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मोहान भोसले यांनी तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी 2005 पासून सातत्याने प्रयत्न केले असून, विविध आंदोलन, निवेदने व जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाला गती दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज रेल्वे प्रकल्पाच्या कामाला चालना मिळाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दि. 11 एप्रिल 2026 रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
ए. डी. फाउंडेशन ही संस्था 2022 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गरीब, गरजू, अनाथ, अपंग तसेच वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षण, आरोग्य व समाजकल्याण या क्षेत्रात संस्थेचे कार्य महाराष्ट्रभर विस्तारलेले आहे.
या पुरस्कारामुळे मोहन भोसले यांच्या कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

.jpg)
